कायमस्वरुपी अपंगत्व आलेल्या होमगार्डला मिळाले २५ लाखाच्या विम्याचे संरक्षण…!

रायगड : रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील गणेशोत्सव बंदोबस्ताकरीता खालापूर पोलीस ठाणे येथे श्री. लक्ष्मण विठ्ठल आखाडे होमगार्ड रात्रपाळीसाठी दरोडा प्रतिबंधक पथक या ठिकाणी कर्तव्यावर असताना दिनांक ५ / ९ / २०२२ रोजी पहाटे ०१.३० वाजता मुंबई पुणे एक्स्प्रेस हायवे येथे अपघात झाला होता. सदर अपघातामध्ये श्री. आखाडे यांना कायमस्वरुपी अपंगत्व आले होते.

मा. महासामादेशक होमगार्ड महाराष्ट्र राज्य, मुंबई यांनी महाराष्ट्र राज्यातील होमगार्डना विमाचे संरक्षण प्राप्त व्हावे याकरीता चाळीस हजार होमगार्ड यांचे एच. डी. एफ. सी. बँकेत खाते उघडून सर्वाना विमा संरक्षण मिळवून दिले आहे.

त्यांचेच प्रयत्न म्हणून दि. १६/०१/२०२३ रोजी जिल्हा समादेशक, होमगार्ड रायगड येथील होमगार्ड श्री. लक्ष्मण विठठल आखाडे सं. क्र १००६१००४८८६ यांचे एच.डी.एफ.सी बँकेत खाते असल्याने झालेल्या अपघातामुळे त्यांना अपगंत्व विमा संरक्षणार्तगत ( Partial Disability Claim ) रक्कम रुपये २५,००,००० /- ( अक्षरी पंचवीस लाख ) चा धनादेश मिळाला आहे.

दिनांक १६/०१/२०२३ रोजी सदरचा धनादेश श्री लक्ष्मण आखाडे यांना देण्यासाठी मा. श्री भुषण कुमार उपाध्याय , ( भा.पो.से. ), महासामदेशक, होमगार्ड महाराष्ट्र राज्य, मुंबई, मा. श्री. ब्रिजेश सिंह, ( भा.पो.से.), उपमहासमादेशक, होमगार्ड महाराष्ट्र राज्य, मुंबई. श्री. अतुल उत्तमराव झेंडे, जिल्हा समादेशक, होमगार्ड रायगड तथा अपर पोलीस अधिक्षक, श्री. संदिप कोचर, वाईस प्रेसिडेंट कॉर्पोरेट सॅलरी एच. डी. एफ. सी. बँक व श्रीमती मंजरी सावंत क्लेम सेटलमेंट मॅनेजर एच. डि. एफ. सी. बँक उपस्थित होते.