दुर्दैवी | सिलेंडरचा भीषण स्फोट | माय – लेकराचा मृत्यू

रत्नागिरी : रत्नागिरी शहरातील शेट्ये नगर येथे आशियाना ग्रुह निर्माण संस्थेच्या इमारतीत आज पहाटे पाचच्या सुमारास घरात सिलेंडरचा स्फोट होऊन मोठा अपघात घडला. अपघात इतका भीषण होता की या स्फोटाचा आवाज तब्बल दोन किलोमीटर पर्यंत ऐकू गेला. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार शेटे नगर येथील अश्फाक काझी यांच्या घरात हा अपघात झाला.

अश्फाक काझी हे रिक्षा चालक आहेत. पहाटे पाच वाजता ते नेहमीप्रमाणे उठले असता त्यांनी घरातील लाईट लावले व नेमके त्याच वेळी हा स्फोट झाल्याचे बोलले जात आहे. या स्फोटात अश्फाक काझी यांच्या घरातील दोन जण जखमी झाल्या आहेत. या घरात सिलेंडर चा स्फोट झाल्यावर या घराचा स्लॅब कोसळून या घरात अडकलेल्या आई व मुलीचा जागीच म्रुत्यू झाला आहे. तर चौघे जखमी झाले असून, यात एका लहान मुलाचा समावेश असून जखमी मधील युवक अति भाजल्याने अति गंभीर आहे.

जखमींना उपचारासाठी रत्नागिरीतील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याच घराच्या शेजारी राहणाऱ्या दोघांना देखील या अपघातामुळे इजा झाली आहे. स्फोट एवढा मोठा होता की या घराच्या शेजारी असणाऱ्या घरांच्या खिडकीच्या काचा देखील फुटल्या. सुमारे दोन किलोमीटर दूरवर या स्फोटाचा आवाज ऐकू गेला. घटनास्थळी स्थळी पोलीस राखीव पोलीस त्याचप्रमाणे अग्निशमन दल आपत्ती व्यवस्थापनविशेष पोलीस पथक तैनात करण्यात आले आहे.