समुद्री कासवाला जीवदान…!

सिंधुदुर्ग : मालवण देवबाग विठ्ठल मंदिर येथील, गावकर कुटुंबीयांची चिंतामणी बोट मासेमारी साठी खोल समुद्रात गेली होती. जाळी ओढताना त्यात समुद्री कासव अडकलेले आढळले बोटवर जाळी ओढत असलेल्या लाडोबा गावकर यांनी चाकूने जाळी तोडून कासवाला कोणतीही इजा न होता, सुरक्षित पुन्हा समुद्रात सोडले चिंतामणी बोटीवर लाडोबा गावकर सोबत रमाकांत गावकर आणि साईल सारंग हे खलाशी होते. कासव संवर्धनाच्या दृष्टीने मच्छीमार बांधवा मध्ये मोठ्या प्रमाणात जनजागृती झाली आहे.