पुणे : शहरात कोयते उगारुन दहशत माजविण्याचे सत्र कायम आहे. शिवाजीनगर, हडपसर भागात टोळक्याने कोयते उगारुन दहशत माजविल्याच्या घटना उघडकीस आल्या.
सतीश भीमा काळे (वय ४१, रा. जुना तोफखाना, शिवाजीनगर) असे गंभीर जखमी झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी तुषार काकडे, मोन्या कुचेकर, दीपू शर्मा , दाद्या बगाडे (सर्व रा. हडपसर ) यांच्याविरूद्ध शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सराईत गुंड दीपू शर्मा याला अटक करण्यात आली आहे.





