रोहा : रोहा तालुक्यातील शेणवई गावचे सामाजिक कार्यकर्ते शंकर देशमुख यांचे वृद्धापकाळाने नुकतेच निधन झाले.त्यांच्या निधनाने सबंध देशमुख कुटुंबियांसह पंचक्रोशीतील वातावरण शोकाकुल झाले आहे.देशमुख यांच्या निधनाचे वृत्त समजताच असंख्य चाहत्यांनी त्यांच्या अंत्यदर्शनासाठी धाव घेतली.
अत्यंत प्रेमळ स्वभावाचे आणी मनमिळावू वॄत्तीचे असलेले स्व.शंकर केशव देशमुख शांत,संयमी आणि सृजनशील व्यक्तिमत्त्व म्हणूनही सर्वपरिचित होते.त्यांना धार्मिक तसेच सामाजिक विषयांत विशेष आवड होती.शेती हा हाच मूळ व्यवसाय सांभाळीत त्यांनी मुलांना मोठे करून उत्तम शिक्षण देत चांगले संस्कार केले.अखेर वृद्धापकाळाने त्यांची प्राणज्योत मालवली.त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच शेणवई येथे त्यांच्या निवासस्थानी मोठा जनसमुदाय लोटला होता.त्यांच्या अंत्ययात्रेस सामाजिक,राजकीय क्षेत्रासह इतर क्षेत्रातील मान्यवर,नातेवाईक,ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.आप्तस्वकीयांनी त्यांच्या निवासस्थानी अंत्यदर्शन घेऊन देशमुख परिवाराचे सात्वंन केले.शेणवई येथील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिव देहावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
त्यांच्या पश्चात ३ मुलगे,१ मुलगी,सुना,जावई,नातवंडे असा मोठा परिवार आहे.त्यांचे अंतिम धार्मिक उत्तरकार्य विधी मंगळवार दि.२५ जुलै रोजी शेणवई येथील त्यांच्या निवासस्थानी होणार आहेत असे संजय देशमुख यांनी सांगितले.





