यवतमाळ : विदर्भात मागील काही दिवसांपासून पावसाचे थैमान सुरू आहे. यादम्यान यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुक्यातील आनंदनगर तांडा येथे सुमारे 45 लोक पुराच्या पाण्यात अडकल्याची माहिती समोर आली आहे. यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे या नागरिकांच्या मदतीला धावून आले आहेत.
यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुक्यातील आनंदनगर तांडा येथे पुराच्या पाण्यामुळे सुमारे 45 लोक अडकले आहेत. आम्ही सातत्याने स्थानिक प्रशासनाच्या संपर्कात असून आता तासभरात भारतीय हवाई दलाचे 2 हेलिकॉप्टर्स नागपुरात पोहोचतील आणि तेथून अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी लगेच महागावसाठी रवाना होतील, अशी माहिती फडणवीस यांनी दिली आहे.
तसेच सुमारे 231 मिमी पाऊस येथे झाला आहे. माझे सहकारी मदनभाऊ येरावार सुद्धा संपर्कात आहेत. परिस्थितीवर आम्ही लक्ष ठेवून आहोत अशी माहिती देखील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीट करत दिली आहे.



