सावंतवाडी : तालुक्यातील शेर्ले येथील पुरग्रस्त भागाची पाहणी करत तेथील पुरग्रस्तांना योग्य ती मदत केली जाईल, असे आवाहन सावंतवाडीचे तहसीलदार श्रीधर पाटील यांनी केले.
आज शेर्ले येथे पूरग्रस्त भागाची पाहणी करून तेथील नुकसानग्रस्त लोकांशी त्यांनी संवाद साधला. यावेळी त्यांच्यासोबत सरपंच प्रांजल जाधव, पोलीस पाटील विश्राम जाधव, ग्रामसेवक राजन नाईक व इतर मान्यवर उपस्थित होते.





