क्वीन्सपार्क -ओव्हल : भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी भारतीय चाहत्यांचे लक्ष हे फक्त आणि फक्त विराट कोहलीवर असणार आहे. विराट कोहली आपला 500 वा आंतरराष्ट्रीय सामना खेळत असून पहिल्या दिवसाचा खेळ संपला त्यावेळी तो 87 धावा करून नाबाद होता.
आज दुसऱ्या दिवशी त्याच्याकडून आपले 29 वे कसोटी शतक पूर्ण करण्याची अपेक्षा आहे. जर विराट कोहली शतकी खेळी करण्यात यशस्वी झाला तर 500 व्या आंतरराष्ट्रीय सामन्यात शतकी खेळी करणारा तो जगातील पहिला फलंदाज ठरणार आहे.
पहिल्या दिवशीचा खेळ संपला त्यावेळी भारताच्या 4 बाद 288 धावा झाल्या होत्या. विराट सोबत शतकी भागीदारी रचणारा रविंद्र जडेजा देखील 36 धावा करून नाबाद होता. आज दुसऱ्या दिवशी भारत विंडीजसमोर मोठी धावसंख्या उभारण्याच्या प्रयत्नात असेल.





