रत्नागिरी जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालयांना सलग तिसऱ्या दिवशी शनिवारीही सुट्टी | जिल्हाधिकारी यांचा निर्णय..!

22

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात भारतीय हवामान खात्याच्या वर्तवलेल्या अंदाजानुसार दिनांक 20/07/2023 ते 24/07/2023 रोजी रत्नागिरी जिल्हयात मुसळधार पाउस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे. तसेच सदर कालावधीत रत्नागिरी जिल्ह्याला ऑरंज अलर्ट देण्यात आलेला आहे. रत्नागिरी जिल्हयातील अनेक भागात मुसळधार पाउस सुरु असल्याने तसेच खेड तालुक्यातील जगबुडी नदीने धोका पातळी ओलांडली आहे तसेच चिपळूण तालुक्यातील वाशिष्ठी नदीचे इशारा पातळी ओलांडली आहे. चिपळूण व खेड तालुक्यातील अनेक भागात पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. चिपळूण व खेड तालुक्यात कोणत्याही प्रकारची अनुसुचित घटना घडू नये तसेच अतिवष्टीमुळे आपतकालीन परिस्थिती निर्माण झाल्यास त्याचा परिणाम शालेय विद्यार्थ्यावर होऊ नये या करिता जिल्ह्यातील सर्व शाळा ( अंगणवाडी, पुर्व प्राथमिक व प्राथमिक) विद्यालये विद्यार्थांना दिनांक 22/07/2023 रोजी सुट्टी असणे आवश्यक आहे असे असा निर्णय जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंग यांनी घेतला आहे.