‘पोलीस परिवार’च्या हाकेला मुख्यमंत्री धावले! ‘एपीआय’च्या कुटुंबियांना तात्काळ मदतीचे आदेश..!

32

मुंबई : गेल्या तीन दिवसांत महाराष्ट्रात झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक जीव गेले. मृतांमध्ये उरण पोलीस स्टेशनला काम करणाऱ्या एका पोलीस अधिकाऱ्यांचाही समावेश आहे. एपीआय विशाल राजवाडे कर्तव्यांवर असताना शहिद झाले.
विशाल राजवाडे हे रात्रभर उरण भागातील चिरनेर भागात पुरग्रस्तांना मदत करत होते. चिरनेर भागात पुरपरिस्थिती निर्माण झाली होती. स्वतः फिल्डवर उतरून विशाल राजवाडे हे पूरग्रस्तांना मदतीचा हात देत होते. त्याचवेळी त्यांना ह्दयविकाराचा झटका आला. त्यांच्या मृत्यूने पोलिस दलात हळहळ व्यक्त होत आहे.

‘पोलीस परिवार’ या संस्थेनं हा मुद्दा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यापर्यंत पोहोचवला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने दखल घेत नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारांबे यांना फोन केला. विशाल राजवाडे यांचा कर्तव्यांवर असताना मृत्यू झाला आहे, जेवढी शक्य असेल तेवढी मदत या कुटुंबियांना करा. तसेच अनुकंपतत्वावर कुटुंबियांतील व्यक्तीला घेण्यात येऊ शकतं का? यासाठी तपासणी करण्याचे आदेश देण्यात आले आहे.
स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या घटनेवर हळहळ व्यक्त केली आहे. तसेच झालेली घटना वेदनादायी असल्याची भावना व्यक्त केली.