दोडामार्ग : शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या वाढदिवसानिमित्त साटेली भेडशी येते आज ऑर्थोपेडिक शिबीरचे आयोजन केले गेले. शिबिराला प्रचंड प्रसिसाद मिळाला. या शिबिराला लोकमान्य हॉस्पिटल, पुणेची सर्व टीमचे सहकार्य लाभले. या शिबिराचा 270 रुग्णांनी लाभ घेतला. याचे उदघाट्न शिवसेना तालुका प्रमुख गणेशप्रसाद गवस, उपजिल्हा प्रमुख राजेंद्र निंबाळकर, तालुका संघटक गोपाळ गवस, डॉ. पाटील, युवा तालुका प्रमुख भगवान गावस,, दादा देसाई, योगेश महाले, प्रवीण गवस, मायकल लोबो, रामदास मेस्त्री, विनायक शेट्ये, संजय गवस,गुरुदास सावंत,शशिकांत गवस अरुण नाईक, चेतना गाडेकर, महिला तालुका प्रमुख, मनीषा गवस, उपजिल्हा महिला प्रमुख, हर्षा टोपले,, रेखा लोंढे,आदी पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी गणेश प्रसाद गवस, राजेंद्र निबाळकर, डॉ. पाटील यांनी मार्गदर्शन केले. दीपप्रज्वलनाने शिबीराचे उदघाट्न केले गेले, सूत्रसंचालन गोपाळ गवस यांनी केले. शिबिराची सांगता करताना लोकमान्य हॉस्पिटल पुणेच्या सर्व टीमचे आभार गणेश प्रसाद गवस यांनी मानले.
Home दोडामार्ग : मंत्री दीपक केसरकर यांच्या वाढदिवसानिमित्त साटेली -भेडशी येथील ऑर्थोपेडिक शिबिराला उदंड प्रतिसाद..!





