सावंतवाडी : आय टी आय च्या विद्यार्थ्याना पास मिळवून दिल्या बद्दल हेमंत मराठे यांचे शिक्षक व विद्यार्थ्यांनी आभार मानले आहेत.
सावंतवाडी कोलगाव येथील शासकीय तंत्र निकेतन (आय टी आय ) मधील काही विद्यार्थ्याना आय टी आय जाणून एक महिन्याचे तर काही विद्यार्थ्याना पंधरा दिवसांचे निवासी प्रशिक्षण कुडाळ येथे देण्यात आले होते.यामुळे प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याना एस टी पास चा वापर करता आला नसल्याने पास प्रवासात खंड पडला.ज्यावेळी प्रशिक्षण पूर्ण झाले तेव्हा विद्यार्थी विद्यार्थी प्रवासी पास काढण्यासाठी एक टी च्या पास विभागात गेले असता त्यांच्या विद्यार्थी पास प्रवासात खंड पडल्याने तुम्हाला पास मिळू शकत नाही असे सांगण्यात आले.यावेळी सदरची बाब मळेवाड कोंडूरे उपसरपंच हेमंत मराठे याना विद्यार्थी भेटून माहिती दिली.यानंतर मराठे यांनी सावंतवाडी आगार प्रमुख बुधे यांची भेट घेवून समस्येवर मार्ग काढण्यासाठी चर्चा केली.मात्र चर्चेतुन मार्ग न निघाल्याने मराठे यांनी एस टी च्या जिल्हा विभाग नियंत्रक अभिजीत पाटील याना संपर्क साधून चर्चा केली.यानंतर पाटील यांनी बुधे याना फोन वर विद्यार्थ्याना पास देण्याच्या सूचना दिल्या.यानंतर विद्यार्थ्याना पास वितरित करण्यात आले.यामुळे विद्यार्थ्यांचे होणारे आर्थिक नुकसान वाचले.या बद्दल विद्यार्थी व शिक्षक यांनी हेमंत मराठे यांचे आभार मानले.तर मराठे यांनी एस टी विभाग नियंत्रक अभिजीत पाटील यांचे आभार मानले.



