BIG BREAKING…माळीणची पुनरावृत्ती | खालापूर गावावर दरड कोसळली ; चार जणांचा मृत्यू..!

104

खालापूर : खालापूरजवळील इरसालवाडीमध्ये माळीण आणि तळीयेची पुनरावृत्ती झाली आहे. बुधवारी रात्री इरसाळगड (इरसाळ वाडी) येथे दरड कोसळून ३० ते ४० घरे मलब्याखाली अडकल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या दुर्घटनेत चार जणांचा मृत्यू झाला असून १०० हून अधिक लोक अडकल्याची शक्यता आहे. एनडीआरएफ, पोलीस आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीने या ठिकाणी बचाव कार्य सुरू करण्यात आले आहे. मात्र पावसामुळे मदत कार्यात अडथळा निर्माण होत आहे.

आतापर्यंत २५ लोकांना सुखरूप बाहेर काढण्यात यश मिळाले आहे. तर या दुर्दैवी घटनेमध्ये चार जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती उद्योग मंत्री उदय सामंत यांनी दिली.