वैभववाडी रोटरी क्लबकडून शालेय विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी..!

45

वैभववाडी : रोटरी क्लब वैभववाडीच्या माध्यमातून दत्त विद्यामंदिर वैभववाडी येथे विद्यार्थ्यांची दंत तपासणी करण्यात आली.डाॕ. अमेय मराठे यानी तपासणी केली. डाॕ. विद्याधर तायशेटे रोटरी क्लब डिस्ट्रिक्स सेक्रेटरी मेडीकल कॕप ३१७० यानी त्यांच्या कार्यकाळात पुरस्कृत केलेला दंत आरोग्य तपासणी कॕप पार पडला.

यावेळी व्यासपीठावर रोटरीचे अध्यक्ष श्री. संजय रावराणे, सचिव प्रशांत गुळेकर, ट्रेझरर श्री तेजस आंबेकर, श्री. संतोष टक्के, श्री.सचिन रावराणे, प्रा. नामदेव गवळी, श्री.मुकुंद रावराणे, श्री. संतोष कोलते, सलोनी टक्के, श्रेया धावले, पूजा सावंत, मुख्याध्यापक दिप्ती दिगंबर पाटील व सहकारी शिक्षक उपस्थित होते. यावेळी एकूण ९४ विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात आली. सकाळी ब्रश हातात घेऊन टुथस्पेटने दात कसे घासावेत, आपण आपल्या दातांची काळजी कशी घ्यावी याचे मार्गदर्शन डाॕ. अमेय मराठे यानी केले.

यावेळी सर्व विद्यार्थ्यांना नविन टुथपेस्ट व ब्रश याचे वाटप करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांना आवश्यक ती ओषधे लिहून देण्यात आली. यावेळी पालकांना मार्गदर्शन करण्यात आले. रोटरीच्या या कार्यक्रमाची आवश्यकता व महत्त्व अध्यक्ष श्री संजय रावराणे यानी सांगितले. व सचिव गुळेकर यानी आभार मानले.