मुंबई : मुंबई, ठाणे, रायगड, पालघर जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अंदार वर्तविण्यात आला आहे. त्यामुळे मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघरमध्ये शाळांना उद्या सुट्टी देण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.मुसळधार पावसामुळे रेल्वे उशीरा धावत असल्यानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रेल्वे स्थानकाच्या बाहेरून तातडीनं बस आणि एसटी सेवा सुरु करण्होयाचे निर्देश दिले आहेत. सर्व रेल्वे स्थानकांत सध्या प्रवाशांची मोठी गर्दी झाली आहे. त्यामुळे सीएसएमटी, भायखळा, दादर, घाटकोपर, ठाणे स्थानकाच्या बाहेरून एसटी व बसेस सोडण्यात येणार आहे. तसेच चर्चगेट, मुंबई सेट्र्ल, दादर, वांद्रे, अधेरी व बोरिवली स्टेशनच्या बाहेर एसटी व बसेसची सोय करण्यात येणार आहे. मध्य रेल्वेवरील सीएसएमटी ते डोंबिवली लोकल सुरू
मध्ये रेल्वेवरची सीएसएमटी ते डोंबिवली लोक सुरू झाली आहे. हर्बर रेल्वेरली वाहतूक अर्ध्या तास उशिराने धावत आहे. मात्र कल्यापासून पुढची लोकसेवा बंद आहे. मुसळधार पावसामुळे तिन्ही रेल्वेमार्गावर लोकल उशिराने धावत आहे. त्यामुळे चाकरमान्यांना पावसामुळे मनस्ताप सहन करावा लागत आहे.





