पुरळ कोठारवाडी येथील सेवानिवृत्त कर्मचाऱ्याची २७ लाख ३४ हजार ९२५ रुपयांची फसवणूक

देवगड : बंद पडलेल्या पॉलीशीची मुदत पुर्ण झाल्यानंतर मिळणारी रक्कम मिळून देतो असे सांगून त्या पॉलिसीचे हप्ते टप्या टप्याने अज्ञात इसमाने दिलेल्या बँक खात्यात जमा करा असे सांगून पुरळ कोठारवाडी येथील मुंबई विदयापिठाच्या सेवा निवृत्त कर्मचा-याची सुमारे २७ लाख ३४ हजार ९२५ रुपयांची आर्थीक फसवणूक केल्या प्रकरणी विजयदुर्ग पोलीस स्थानकात अज्ञात ईसमा विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुरळ कोठारवाडी येथील मुंबई विदयापीठामधील सेवा निवृत्त कर्मचारी सहदेव बाबु मुळम (६४) यांना मोबाईलवरती वेळोवेळी एसएमएस व कॉल वरती संपर्क साधून अज्ञात इसमाने आय सी आय सी आय प्रोडेशनल लाईन इंन्शुरन्स कंपनीच्या पॉलीशीचे पैसे मिळून देतो असे सांगून सुमारे २७ लाख ३४ हजार ९२५ रुपयांची आर्थीक फसवणूक केल्या प्रकरणी विजयदुर्ग पोलीस ठाण्यामध्ये अज्ञात ईसमाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची घटना हि ३१ जूलै २०२१ मध्ये घडली आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीवरुन पुरळ कोठारवाडी येथील सहदेव मुळम हे मुंबई विदयापिठामध्ये नोकरीस होते. सदया ते सेवा निवृत्त झाल्यामुळे गावी राहत आहेत. ३१ जुलै २०२१ रोजी ११ वा. सुमारास त्यांना अनोळख्या व्यक्तीने त्यांच्या मोबाईलवरती एसएमएस तसेच कॉल करुन आपण आयसीआय इंन्शुरन्स कंपनीमधून बोलत असून तुमची बंद पडलेली पॉलीशी पुन्हा सुरु करुन पॉलीशीची मुदत पुर्ण झाल्यानंतर मिळणारी एकुण ३८ लाख रुपये रक्कम मिळवून देतो असे सांगून त्यासाठी तुम्हाला २० वर्षे थकित राहिलेले पॉलीशीचे हप्ते टप्या टप्याने भरावे लागतील असे सांगून ३१ जुलै २०२१ पासून ते ७ जुलै २०२३ पर्यंत सुमारे २७ लाख ३४ हजार ९२५ रुपयांचा अज्ञात इसमाने दिलेल्या बँक खात्यावरती जमा केले. मुळम यांनी बँक ऑफ महाराष्ट्र पडेल शाखा व बँक ऑफ इंडिया पडेल शाखेमधून अज्ञात इसमाने दिलेल्या खात्यामध्ये पैसे जमा केल्यानंतर ७ जुलै २०२३ रोजी आपली अज्ञात व्यक्तीकडून सुमारे २७ लाख ३४ हजार ९२५ रुपयांची आर्थीक फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर १५ जुलै २०२३ रोजी विजयदुर्ग पोलीस स्थानकात फसवणूक झाल्याची तक्रार दिली. यावरुन विजयदुर्ग पोलीसांनी अज्ञात इसमा विरोधात भादवि कलम ४१९,४२० व माहिती तंत्रज्ञान अधिनियम २०००:६६ (ड) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. असून या गुन्हाचा अधिक तपास देवगड पोलीस स्टेशनचे व विजयदुर्ग पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरिक्षक हेमंत देवरे करत आहेत.