हायवेवर पावसाचे पाणी साचल्याने चालकाचा अंदाज चुकला !
ओरोस : येथे चालकाचे गाडीवरून नियंत्रण सुटल्याने डिव्हायडर ओलांडून चारचाकी गाडीला अपघात झाला. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसून किरकोळ दुखापत झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. मात्र गाडीच्या दर्शनी भागाचे मोठे नुकसान झाले आहे. सतत मुसळधार पडणारा पाऊस आणि यामुळे चारपदरी हायवेवर साचलेलं पाणी याचा चालकाला अंदाज न आल्याने सदरचा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती घटनास्थळी मिळालेली आहे.



