सावंतवाडी : आज सावंतवाडी तालुका काँग्रेस कमिटीची बैठक राणी पार्वतीदेवी हायस्कूल येथील हॉलमध्ये सावंतवाडी तालुका काँग्रेसचे अध्यक्ष महेंद्र लक्ष्मण सांगेलकर यांच्या अध्यक्षतेखाली व जिल्हा काँग्रेसचे माजी अध्यक्ष विकास सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली.
सदरील सभा ही मंडळ काँग्रेस समिती गठीत करणे व ग्राम कमिटी, बूथ कमिटी गठीत करण्यासंदर्भात गाववार आढावा घेण्यात आला.
या बैठकीत कार्यकर्त्यांना संबोधित करताना माजी जिल्हाध्यक्ष विकास सावंत म्हणाले की, राज्यामध्ये विरोधीपक्ष म्हणून सध्या काँग्रेस आपली भूमिका चोखपणे बजावत असल्याने सामान्य माणसांमध्ये काँग्रेस हेच आश्वासक व विश्वास असल्याचा पक्ष म्हणून आपला ठसा उमटवत आहे. आगामी निवडणुकांमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांनी काँग्रेसचा विचार जनतेपर्यंत पोहोचवावा, असेही गौरोद्गार त्यांनी काढले.
बैठकीचे सूत्रसंचालन रवींद्र म्हापसेकर व आभार राघवेंद्र नार्वेकर यांनी मानले.
सदर या बैठकीला महेंद्र सांगेलकर (अध्यक्ष – सावंतवाडी तालुका काँग्रेस कमिटी),
विकास सावंत (माजी जिल्हाध्यक्ष – सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस कमिटी), साक्षी वंजारी (अध्यक्षा – सिंधुदुर्ग जिल्हा महिला काँग्रेस), राजू मसुरकर, रवींद्र म्हापसेकर, विभावरी सुकी, राघवेंद्र नार्वेकर,स्मिता वाघळे, समीर वंजारी, माया चिटणीस, जास्मीन लक्ष्मेश्वर, संभाजी सावंत,बाळा नमशी, राजेंद्र मसुरकर, विठ्ठल केदार, मायकल फर्नांडिस, गजानन राफकर, रविराज पेडणेकर, समीर भाट, अमिदी मेस्त्री, प्रमोद परब, प्रकाश बांदेकर, अरुण नाईक, कौस्तुभ पेडणेकर, गणेश मिरजकर, राकेश चितारी, मनोहर वेंगुर्लेकर, रफिक नाईक,चंद्रकांत राणे, राजेंद्र सावंत, अभय मालवणकर, बाळासाहेब नंदीहळ्ळी, आनंद कुंभार, सुधीर मल्हार, संजय लाड, रुपेश आईर, संतोष सावंत, सुमेघा सावंत, संतोष मडगावकर, बाबाजी राणे यांसह काँग्रेस कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.





