परदेशी भारतीयांच्या सुरक्षेसाठी भारत कटिबद्ध! – पंतप्रधान नरेंद्र मोदी

40

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दोन दिवसांच्या फ्रान्सच्या दौऱ्यावर असून त्यांचे पॅरिसमध्ये जल्लोषात स्वागत करण्यात आले. फ्रान्सच्या पंतप्रधान एलिझाबेथ बोर्न यांनी यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विमानतळावर स्वागत केले. तसेच पंतप्रधान मोदी यांना यावेळी गार्ड ऑफ ऑनर देखील देण्यात आला. फ्रांसमध्ये झालेल्या कार्यक्रमात त्यांनी परदेशात राहणाऱ्या भारतीयांच्या सुरक्षिततेसाठी भारत सरकार कटिबद्ध असल्याचा विश्वासही मोदी यांनी यावेळी व्यक्त केला.

फ्रांसमध्ये पोहचताच मोदी यांच्यासाठी रेड कार्पेपेटवरवर जंगी स्वागत करण्यात आले. तसेच दोन्ही देशांचे राष्ट्रगीत वाजवत त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले. फ्रांसचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्याशी मोदी विस्तृत चर्चा करणार आहेत. द्विपक्षीय संरक्षण संबंधांचा विस्तार हा फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यासोबत पंतप्रधान मोदींच्या चर्चेचा मुख्य केंद्रबिंदू राहणार आहे.

भारतामध्ये गुंतवणूक करण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फ्रान्समध्ये राहणाऱ्या भारतीय समुदायाला केले आहे. यावेळी त्यांनी अनेक विषयावर भाष्य केले. दहशतवाद आणि कट्टरवादावरही त्यांनी भाष्य केले. परदेशात राहणाऱ्या भारतीयांच्या सुरक्षिततेसाठी भारत सरकार कमिटेड असल्याचा विश्वासही यावेळी मोदींनी व्यक्त केला. फ्रान्समध्ये पोस्ट मास्टर्स करणाऱ्या विद्यार्थ्यांना भारताकडून पाच वर्षांसाठी पोस्ट स्टडी व्हिसा देण्यात येईल, असेही मोदींनी यावेळी सांगितले.