आगामी निवडणुका स्वबळावर लढणार..! – राज ठाकरे

59

खेड : आगामी जाहीर होणाऱ्या नगरपरिषदेच्या निवडणुका स्वबळावर लढवणार असल्याच्या स्पष्ट सूचना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी खेड येथील कार्यकर्ता मेळाव्यात पदाधिकारी व कार्यकर्त्यांना दिल्या.

खेड शहरातील वैश्य भवन येथे कार्यकर्ता मेळावा व पक्ष प्रवेश गुरुवारी आयोजित करण्यात आला होता.
यावेळी राज ठाकरे बोलत होत.
ते पुढे म्हणाले की, संपूर्ण दौरा हा नवीन पदाधिकाऱ्यांच्या नेमणुका, पक्ष बांधणी याच्यासाठी हा दौरा आहे. हा दौरा काही भाषणचा नाही.
गेल्या ५ ते ६ वर्षात तुम्ही किती भाषणे ऐकली आहेत, आणि त्या भाषणाचे परिमाण ही तुम्ही भोगत आहात.
मी त्यादिवशी माझी प्रतिक्रिया देताना सांगितले की, जो चुकीचा कॅरम फुटतो ना आणि कुठच्या सोंगट्या कुणाच्या भोकात आहेत तेच कळत नाही. कोण कुठे आहे? सध्या तेच कळत नाही. मला माझ्या सहकाऱ्यांचा अभिमान वाटतो. बाहेर जाता जेव्हा ओळख सांगता की, महाराष्ट्र नव निर्माण सेनेची माणसे आहेत. याचा मला सार्थ अभिमान आहे.

सद्या महाराष्ट्रातील आमदार, खासदार पाहिले तर प्रश्न पडतो आणि विचारावेसे वाटते सद्या कुठे आहे.? सद्या कोणाबरोबर आहात, याचा समाचार येत्या काही दिवसांत घेणार आहे.
माझ्या मनात मला त्रास झालाय. प्रत्येक व्यक्तीला जो त्रास झालाय तो कुठेतरी व्यक्त होणे गरजेचे आहे. पक्ष म्हणून ‘एक सही संतापाची’ ही मोहीम राबवली.
नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद त्याला मिळाला. लोकांनी येऊन येऊन त्याच्यावर सह्या केल्या. मला आता बघायचे आहे की, येणाऱ्या निवडणूकीत महाराष्ट्रातील जनता राग व्यक्त करते का? की जनता पुन्हा यांच्या सगळ्या पैशावर विकले जात आहेत का?
कारण त्याच त्याच गोष्टी जर अशा होणार असतील आणि तुम्ही नुसते मतदान करत बसणार असाल, तर राजकारण आणि निवडणुकाना काहीच अर्थ उरणार नाही. कशासाठी भाषणे द्यायची अन कशासाठी निवडणूका लढवायच्या?, असा प्रश्न देखील राज ठाकरे यांनी यावेळी उपस्थित केला. यातून जर नागरिकांना आनंद मिळत असेल तर मग भोगा, असा सल्ला देखील ठाकरे यांनी यावेळी दिला.

माझी अपेक्षा आहे, मला तुमची साथ हवी आहे.
पण मागच्या वेळी ज्या गोष्टी झाल्या त्या झाल्या, आता नगरपरिषदेच्या निवडणुकांच्या लढवायच्या आहेत. या आपल्याला स्वबळावरती लढवायची आहेत. कोणालाही बरोबर न घेता, कोणाशी युती नको, कोणत्या भानगडीच नकोत,
आणि मला खात्री आहे की, आपण महाराष्ट्र नव निर्माण सेना खेडमध्ये स्वबळावर निवडणूका लढवेल, निश्चितच आपल्याला यश मिळेल, असा आत्मविश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.