सावंतवाडी – ग्रामपंचायत मळेवाड कोंडूरेकडून गावातील मुलांना मोफत वह्या वाटप करण्यात आल्या. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सावंतवाडी तालुक्यातील ग्रामपंचायत मळेवाड कोंडूरेकडून गावातील सर्व शाळांमधील प्रत्येक विद्यार्थ्यांना ग्रामपंचात कडून मोफत वह्या वाटप करण्यात आले.मळवाड जकातनाका येथील राणी पार्वती देवी विद्यालय मळेवाड केंद्र शाळा नंबर 1 च्या सभागृहात वह्या वाटप कार्यक्रम संपन्न झाला.यावेळी या प्रशालेतील विद्यार्थ्यांना युवा उद्योजक पराग शिरोडकर यांच्या हस्ते वह्या वाटप करण्यात आले.वह्या वाटप कार्यक्रमावेळी उद्योजक शिरोडकर यांनी मुलांना गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा देत शिकून आपले व आपल्या गावाचे व शाळेचे नाव रोशन करावे असे आवाहन केले.तसेच आपल्या वाढदिवसानिमित्त सदर शाळेतील प्रत्येक मुलाला प्रत्येकी एक छत्री देण्याचे ही आश्वासन दिले.
या कार्यक्रमा वेळी उपसरपंच हेमंत मराठे यांनी गावातील शाळेतील मुलांसाठी राबवत असलेल्या वेगवेगळ्या उपक्रमाची माहिती दिली. तसेच पराग शिरोडकर यांचेही आभार मानले.या कार्यक्रमावेळी सरपंच सौ मिलन पार्सेकर, ग्रामपंचायत सदस्य स्नेहल मुळीक, सदस्य अमोल नाईक,सदस्य मधुकर जाधव,सदस्य तात्या मुळीक,सदस्य कविता शेगडे,लाडोबा केरकर मुख्याध्यापक वेंगुर्लेकर,पालक व ग्रामस्थ आदी मोठय़ा सख्येने उपस्थित होते.





