सावंतवाडी तालुका भाजप सरपंच संघटना अध्यक्षपदी दीपक नाईक यांची निवड.!

196

सावंतवाडी – सावंतवाडी भाजप तालुका सरपंच उपसरपंच संघटनेच्या तालुका अध्यक्षपदी किनळे सरपंच दीपक नाईक यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
सावंतवाडी येथील श्रीराम वचन मंदिर च्या सभागृहात भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्या प्रमुख उपस्थितीत सावंतवाडी तालुक्यातील भाजप च्या सर्व सरपंच व उपसरपंच यांची बैठक आयोजित करण्यात आली होती.या बैठकीत सावंतवाडी भाजप तालुका सरपंच उपसरपंच संघटना कार्यकारणी निवड करण्यात आली.सावंतवाडी भाजप तालुका सरपंच उपसरपंच संघटनेच्या सावंतवाडी भाजप तालुका अध्यक्षपदी किनळे सरपंच दीपक नाईक यांचे यांची बिनविरोध निवड करण्यात आली असून सचिव पदी मळेवाड कोंडुरे उपसरपंच हेमंत मराठे,उपाध्यक्षपदी मळगाव उपसरपंच हनुमंत पेडणेकर,उपाध्यक्षपदी आंबोली गावच्या सरपंच सौ सावित्री पालयेकर यांची पदाधिकारी म्हणून निवड बिनविरोध करण्यात आली.या बैठकीवेळी भाजप जिल्हा प्रवक्ते संजू परब,जिल्हा सरचिटणीस महेश सारंग,निरवडे माजी सरपंच प्रमोद गावडे,जिल्हा बँक संचालक रवींद्र मडगावकर,बांदा मंडल अध्यक्ष महेश धुरी आदी उपस्थित होते.