कार्यकारी अभियंता स्वतः पावसात उतरून रस्त्यावरील फांदी बाजूला करतात तेव्हा…!

154

कणकवली : निपाणी रस्त्यावर हडपिड स्वामी समर्थ मठा समोर पावसामुळे झाडाची पडलेली फांदी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड यांनी प्रवासा दरम्यान स्वतः रस्त्यावर उतरून बाजूला केली. अशा कामासाठी रस्ता कामगार येतील अशी वाट न पाहता त्यांनी सहकाऱ्यांसमवेत स्वतःरस्त्यावर उतरत झाड बाजूला केलं व मार्ग मोकळा केला.

यावेळी श्री. बासुतकर, उप विभागीय अभियंता, श्री. नवपुते कनिष्ठ अभियंता यांनी त्यांना मदत केली. हडपिड स्वामी समर्थ मठा कडील वळणावर मुसळदार पावसाने एका झाडाची फांदी तुटून रस्तावर पडली असं मा. कार्यकारी अभियंता यांच्या लक्षात येता क्षणाचा ही विलंब न लावता गाडी थांबून फांदी बाजूला करून रस्ता अपघात होऊ नये म्हणुन तात्काळ श्री. बासुतकर, उप विभागीय अभियंता, श्री. शैलेश कांबळे, श्री. अविनाश लाड वाहन चालक व श्री. रवींद्र गोरुले यांच्या मदतीने केली त्यांनी बजावलेल्या कर्तव्याची सर्वत्र कौतुक होत आहे तसेच त्यांच्या हटके कामाची स्टाइल पुन्हा एकदा चर्चेत आली आहे