कुडाळ :अमरसेन सावंत मित्रमंडळ, डिगस यांच्या वतीने डिगस ग्रामपंचायत नवनिर्वाचित सरपंच,पूनम पवार व चाफेखोल ग्रामपंचायत नवनिर्वाचित सरपंच राजलता गोसावी तसेच डिगस ग्रामपंचायत नवनिर्वाचित उपसरपंच भिसाजी उर्फ मनोज बळीराम पाताडे व सदस्या साक्षी सावंत, रसिका पवार, स्नेहा चव्हाण, राजश्री गुरव, प्रगती भांबळे व सदस्य रुपेश प्रभाकर पवार, विठ्ठल पवार, प्रभाकर झोरे यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी बोलताना नागेंद्र परब म्हणाले राजकारण कसे करावे हे मला अमरसेन सावंत यांनी शिकवले तर अमरसेन सावंत म्हणाले डिगस ग्रामपंचायत आपण आदर्श बनविली पाहिजे. यावेळी चाफेखोल येथील नूतन सरपंच राजलता गोसावी यांचा ही सत्कार करण्यात आला. तसेच या कार्यक्रमाच्या निमित्ताने तांबे गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली श्री काळंबा देवी दशावतार नाट्य मंडळ डिगस यांच्यावतीने नाट्य प्रयोगाचे सादरीकरण करण्यात आले.
यावेळी सदर कार्यक्रमास शिवसेना उपजिल्हाप्रमुख मा. श्री. अमरसेन सावंत, माजी जि.प. सदस्य तथा गटनेते नागेंद्र परब, माजी पंचायत समिती उपसभापती जयभारत पालव, माजी सरपंच मा. पुनाजी उर्फ राजा पवार, माजी सरपंच दिपक चोरगे, माजी उपसरपंच बाळा पवार, अनुजा सावंत, माजी ग्रा. प. सदस्य सोनाली सावंत, दाजी पवार, आबा पवार, रुपेश पवार, संजय तावडे, उदय धावले, बाळा राणे, राजू गुरव, संतोष गोसावी, दशरथ गोसावी, सुनील जाधव, नारायण गोसावी आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनुजा सावंत यांनी केले तर आभार रुपेश पवार यांनी मांडले.





