सिंधुदूर्गनगरी : सोशल मीडियावर सिंधूदुर्ग च्या स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखा चे हेड कॉन्स्टेबल प्रमोद काळसेकर यांनी व्हायरल केलेल्या मेसेजने एका दिवसातच हरवलेल्या आईचा शोध लागला.आणि माय लेकराची भेट झाली. ही घटना आहे मुंबई, कुर्ला असल्फा येथील कुमुदिनी परब (वय ८०) रा.मुंबई, कुर्ला असल्फा , या ता. ११ ला सकाळी घरगुती कामासाठी बाहेर पडल्या आणि येथील रस्त्याचे काम सुरू असल्याने रस्ता चुकल्या व घरी परत आल्याच नाहीत. यांचा मुलगा नंदकुमार परब यांनी आपली आई कुमुदिनी परब हरवल्या असल्याची तक्रार सोशल मिडिया वर टाकली होती. सेवानिवृत पोलिसांच्या व्हाट्सएप ग्रुप चा हा संदेश प्रमोद काळसेकर यांनी परब आड़नाव असल्याने हा संदेश सोशल मीडियाद्वारे वेगाने कोकण विभागात फिरवला. मनपाडा पोलीसांना त्यामुळेच कुमुदिनी परब आणि नंदकुमार परब यांची भेट घडवून आणणे अधिक सोपे झाले .या कामी डोंबिवली पूर्व मानपाडा पोलीस ठाणे येथील पोलीस अधिकारी गायकवाड, कापडी तसेच पोलीस कर्मचारी यांचे ही विशेष सहकार्य मिळाले आहे .





