प्रेमसंबंधांस विरोध केला म्हणून पतीचा खून | गुन्हेगारास जन्मठेपेची शिक्षा ठोठावली…

253

सिंधुदुर्गनगरी : पत्नीबरोबर असलेल्या प्रेमसंबंधांस विरोध केला म्हणून पतीचा खून करणाऱ्या
गुन्हेगारास अति सत्र न्यायाधीश, सिंधुदुर्ग यांनी जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे अशी माहिती सिंधुदूर्ग पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांनी प्रेस नोट देऊन दिली आहे.

सविस्तर माहिती अशी की. बांदा गडगेवाडी, ता. सावंतवाडी येथील शमकरंद तोरसकर यांचे घरी भाडयानेविश्वजीत कालीपद मंडळ, वय ३४ मूळ रा. सरईपूर गोलवाधन, जि. परगणा राज्य पश्चिम बंगाल हा कामगार आपली पत्नी व दोन मुलांसह राहत होता. सिद्धदोष अपराधी सुखदेव सोपान बारीक वय ३० रा. उल्हास नदीचे जवळ रेल्वे पुलाच्या पत्र्याच्या शेडमध्ये, उल्हासनगर, मूळ रा. बाजवेलेनी, ता. गोवरदंगा, जि. उत्तर २४ परगणा राज्य पश्चिम बंगाल याने दि. ०५/०६/२०२१ रोजी मध्यरात्री ०१.०० वा. चे दरम्यान विश्वजीत कालीपद मंडळ याचे घरात प्रवेश करुन त्याची पत्नी व दोन मुलांना बेडरुममध्ये कोंडून ठेवले आणि मयतास लोखंडी टिकावाने जबर मारहाण करुन त्यांचा खून केला आणि पुरावे नष्ट करून रेल्वेने पळून गेला. सदर घटनेच्या आधारे बांदा पोलीस ठाण्याचे पोहेकॉ संजय हुंबे यांनी सरकारतर्फे फिर्याद देवून बांदा पोलीस ठाणे गुन्हा रजि. क्र. ५९/२०२१, भा. दं. दि. कलम ३०२, २०१ ३४९ अन्वये गुन्हा दाखल केला होता.

गुन्हयाचे घटनास्थळी बांदा पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक श्री. अनिल जाधव स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, सिंधुदुर्गचे पथक, फॉरेन्सीक लॅब पुनिट, सायबर सेलचे पथक यांनी भेट देवून आवश्यक ते पुरावे गोळा केले. यांदा पोलीस ठाणे व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा यांनी समांतर तपास करून आरोपी सुखदेव सोपान वारीक हाच असल्याचे निष्पन्न केले व त्यास उल्हासनगर येथून अटक करण्यात आले. त्यास अटक केल्यानंतर त्याने गुन्हयात वापरलेले हत्यार, त्याचे अंगावरील कपडे मेमोरेंडम पंचनामा करून हस्तगत केले. गुन्हयाचे तपासात आरोपीचे मयत याच्या पत्नीशी प्रेमसंबंध होते व त्या प्रेमसंबंधाबद्दल मत हा विरोध करत होता, म्हणून आरोपीने मवत वास जिवे ठार मारल्याचे निष्पन्न झाले.

गुन्हयाचे दोषारोपपत्र न्यायालयात दाखल झाल्यानंतर खटला सिद्धदोषापर्यंत पोहचवणे आवाहानात्मक होते. सुनावणी दरम्यान सरकारतर्फे १२ महत्त्वाचे साक्षीदार तपासण्यात आले. आरोपीच्या नातेवाईकांनी मयत यांची पत्नी व मुलांना फितूर करण्याचा प्रयत्न केला होता. तथापि, सरकारी पक्षाच्या वतीने घेण्यात आलेल्या उलट तपासात महत्वाच्या कल्या मिळून अखेर सत्य बाहेर आले. तसेच, शासकीय वैदयकिय अधिकारी, वोडाफोन कंपनीचे नोडल ऑफिसर व रेल्वे अधिकारी यांची साक्ष महत्त्वाची ठरली. सरकारी वकीलांनी वेळोवेळी मा. उच्चतम न्यायालयाच्या न्यायनिवाडयांचा आधार घेतला आणि अखेर क्रूरपणे गुन्हा करणान्या अपराध्यास जन्मठेपेच्या शिक्षेपर्यंत पोहचवले.

सदरचा न्यायनिर्णय मा. अति सत्र न्यायाधीश श्रीम. सानिका जोशी यांनी दिलेला असून आरोपीस भा. दं. वि. कलम ३०२ अन्वये जन्मठेप, भा. दं. वि. कलम २०१ अन्वये ०३ वर्ष सश्रम कारावास, भा. दं. वि. कलम ३४१ अन्वये १ महिना कारावास व एकूण १२५००/- रु. दंड अशी शिक्षा सुनावलेली आहे.
सदर गुन्हयाचे उत्कृष्ट अन्वेषण श अनिल जाधव, तत्कालीन पोलीस निरीक्षक, बांदा पोलीस ठाणे (सच्या नेमणूक कणकवली पोलीस ठाणे), पोहेकॉ विठोबा सावंत, तात्या कोळेकर, पोहेकॉ संजय हुंबे, पोकों/विजय जाधव यांनी केले. मा. न्यायालयात अभियोग पक्षाच्या वतीने अति. सरकारी अभियोक्ता श्री. गजानन तोडकरी यांनी यशस्वी कामकाज पाहिले. त्यांना सेशन कोर्ट पैरवी अधिकारी, पोलीस उप निरीक्षक श्री. जयराम पाटील, पोहेकॉ मल्लिकार्जुन ऐहोळी, मपोहेकॉ/सिद्धी वेंगुर्लेकर यांनी विशेष मेहनत घेवून उत्तम कामगिरी केलेली आहे.

सिंधुदुर्ग जिल्हयामध्ये न्यायालयांच्या पटलावर चालणान्या फौजदारी खटल्यांचे पर्यवेक्षण व पृथक्करण करण्यासाठी ट्रायल मॉनिटरींग सेलची निर्मिती करण्यात आलेली आहे. त्या माध्यमातून आम्ही पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांचेकडून मा. न्यायालयातील फौजदारी खटल्यांचा कामकाजाचा दैनंदिन आढावा घेवून गुन्हयातील आरोपींना दोषसिद्धी होण्यासाठी वेळोवेळी सूचना देत आहोत. नितीन बगाटे, अपर पोलीस अधीक्षक, सिंधुदुर्ग हेही वेळोवेळी संबंधितांना मार्गदर्शन करीत आहेत. गुन्हेगारांना दोषसिद्धी होण्याचे प्रमाण वाढविण्याचे प्रयत्न नियमीत करण्यात येत आहेत.

गुन्हयाचे तपास अधिकारी व त्यांना सहाय्य करणारे अंमलदार, सरकारी अभियोक्ता व त्यांना सहाय्य करणारे पैरवी अधिकारी व अंमलदार यांनी उल्लेखनीय कामगिरी केलेली असल्याने त्यांचे आपण कौतुक व अभिनंदन करत असल्याचेही सिंधुदुर्ग पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांनी प्रेस नोटमध्ये म्हटले आहे.