बांदा : बांदा येथिल श्री विठ्ठल मंदिरात प्रतिवार्षिक हरिनाम वीणा सप्ताह बुधवारी मोठ्या उत्साहात व भक्तीमय वातावरणात आरंभ झाला. आरंभी परंपरेप्रमाणे वीणा ,समई तसेच सर्व भजनसाहित्य श्री विठ्ठल रखुमाई चरणी ठेऊन देवाला गाऱ्हाणे घालण्यात आले.ज्येष्ठ भजनकर्मी गिरिश महाजन आणि प्रकाश मिशाळ ,प्रमुख सेवेकरी उमेश मयेकर यांनी पुजन केले.यावेळी सातही पारांचे पारप्रमुख विनित पडते,दत्तप्रसाद पावसकर,श्रीप्रसाद वाळके,संदेश पावसकर,उमेश काणेकर,सुदन केसरकर,निलेश महाजन यांच्यासह सेवेकरी , ग्रामस्थ व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.श्री विठ्ठल नामाच्या गजरात वीणा,समई व सर्व भजन साहित्य उचलून ठिक 12 वाजता वीणा सप्ताह आरंभ झाला.त्यानंतर प्रदक्षिणा करुन भजन व आरती करण्यात आली.आरंभापासून सात दिवस हा सप्ताह चालणार आहे.





