आमदार रुग्ण कल्याण समितीचे अध्यक्ष असताना त्यांच्याच कार्यकर्त्यांना डायलिसिस टेक्निशियनसाठी आंदोलन करावे लागते हे दुर्दैव- बुवा तारी

139

देवगड : पर्यटन वाढीच्या दृष्टीने देवगड बीचवर ॲनिमल पार्क करण्यात येणार आहे. मात्र हा प्रकल्प न होण्यासाठी माजी नगराध्यक्षांनी आमदारांच्या वाढदिवसासाठी या बीचवरच वृक्ष लागवडीचे संकल्प केला आहे.अशा प्रकारे देवगड जामसंडे शहराच्या विकासामध्ये कसा खोळंबा आणता येईल एवढेच काम माजी नगराध्यक्ष करीत आहे.असा
घणाघाती आरोप नगरसेवक निवृत्ती तथा बुवा तारी यांनी माजी नगराध्यक्ष यांचेवर केला आहे . नगरसेवक लोकप्रतिनिधी फोडण्यापेक्षा आज रिक्त असलेल्या शिक्षक पदांमुळे शून्य शिक्षकी शाळा झाली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे हे टाळण्यासाठी शाळेमध्ये शिक्षक आणण्यासाठी प्रयत्न करा.असा टोलाही तारी यांनी लगावला .
उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना देवगड तालुका संपर्क कार्यालय आयोजित पत्रकार परिषद यांनी भाजपचे माजी नगराध्यक्ष यांच्यावर घणाघात केला. यावेळी नगराध्यक्ष साक्षी प्रभू, युवासेना उपजिल्हाप्रमुख निनाद देशपांडे, नगरपंचायत बांधकाम सभापती तेजस मामघडी उपस्थित होते. नगरपंचायत मार्फत देवगड बीच येथे प्रस्तावित असलेला ॲनिमल पार्क प्रकल्प देवगड पर्यटन वाढीच्या दृष्टीने आवश्यक असणारा महत्त्वाचा प्रकल्प आहे. हा प्रकल्प झाल्यानंतर देवगडमध्ये पर्यटन वाढेल त्याचबरोबर रोजगारही वाढेल. या दृष्टीने हा प्रकल्प साकारण्यात येत आहे मात्र कायम देवगड जामसंडेच्या विकासात खोळंबा आणण्याचे एवढेच काम भाजपचे माजी नगराध्यक्ष करीत आहे. त्यामुळे ॲनिमल पार्क होणार त्या ठिकाणी त्यांनी आमदारांच्या वाढदिवसानिमित्त वृक्ष लागवडीच्या संकल्प केला आहे. मळई रस्ता,आनंदवाडी रस्ता,मळई स्मशानभूमी रस्ता,आदी विकासकामे सत्तेच्या बळावर रद्द करणे पाणी प्रश्नांसारख्या गंभीर प्रश्नातही खोडा घाल, आनंदवाडी बंदर प्रकल्पाचे काम बंद पडणे, अशा विकासात्मक कामांमध्ये अडथळे आणण्याचे कामही त्यांनी केले आहे. आपल्यावर भ्रष्टाचारी आरोप केले परंतु देवगडमधील जनता सुज्ञ आहे. त्यांना चांगलेच माहिती आहे नगरपंचायत अस्तित्वात घेण्यापूर्वी माझ्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करणाऱ्या माजी नगराध्यक्षांची आर्थिक परिस्थिती जीवनशैली कशी होती. व नगरपंचायत मध्ये सत्ताआल्यानंतर त्यांची ही परिस्थिती कशी बदलली. बेरोजगार युवकांना त्यांची ही प्रेरणा घ्यावी लागेल असा टोलाही लगावला. कचऱ्याच्या जागेवर जाऊन स्टंटबाजी केली. त्यांच्याच सत्ताकाळातील कचरा असून टेंबवली मध्ये घेतलेली जागा पडून आहे यामध्येही कमिशन घेऊन भ्रष्टाचार केला आहे. ज्यांची केंद्र राज्यात सत्ता आहे रुग्ण कल्याण समितीचे अध्यक्ष आमदार आहेत असे असताना ग्रामीण रुग्णालयासमोर त्यांच्याच कार्यकर्त्यांना डायलिसिस टेक्निशियनसाठी आंदोलन करावे लागते ही नामुष्की असून ग्रामीण रुग्णालयात सोयी सुविधांचा अभाव आहे. औषधाची कमतरता आहे मात्र आमदार रुग्ण कल्याण समितीचे अध्यक्ष असूनही कोरोना नंतर या समितीची सभा झाली नाही हे दुर्दैवी आहे.आमदार दक्षता समितीचे अध्यक्ष असून रॉकेल नाही, रेशन नाही अशी स्थिती आहे. मात्र सत्ताधारी असूनही याकडे त्यांचे दुर्लक्ष आहे. जिल्हा शिक्षकांच्या रिक्त पदामुळे शून्य शिक्षकी शाळा झाल्या आहेत. नगरसेवक लोकप्रतिनिधी बोलण्यापेक्षा शिक्षक फोडा व विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी प्रयत्न करा असा खोचक टोलाही देवगड जामसंडे नगरपंचायतीचे नगरसेवक निवृत्ती तथा बुवा तारी यांनी लगावला.