विजेच्या आर्थिग तारेचा स्पर्श होऊन दोन बैलाचा मृत्यू; देवगड तालुक्यातील महाळुंगे येथील घटना…!

164
  1. देवगड : महाळुंगे लिंगूडकाटा येथे विजेच्या अर्थिंग तारेचा स्पर्श होऊन दोन बैलांचा मृत्यू झाला. ही घटना सोमवारी रात्री घडली असून मंगळवारी सकाळी तेथील शेतकऱ्यांच्या निदर्शनास आली.
    याबाबत मिळालेल्या माहितीनुसार देवगड तालुक्यातील महाळुंगे येथील शेतकरी अंकुश वामन साटम व जयसिंग सदानंद देवळेकर यांचे दोन बैल सोमवारी सकाळपर्यंत घरी आले नव्हते.मंगळवारी सकाळी महाळुंगे लिंगुडकाटा येथे विद्युत पुलाच्या बाजूला असलेल्या आर्थिग तारेच्या बाजूला मृत स्थितीत दिसले. आर्थिग तारेचा स्पर्श झाल्याने दोन्ही बैलांचा जागीच मृत्यू झाला. याबाबत वीज वितरणाला माहिती दिल्यानंतर फणसगाव वीज वितरण विभागाचे शाखा अभियंता मंदार कानकेकर व कर्मचारी यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी करत, त्यांच्या रीतसर पंचनामा केला शेतीच्या हंगामात दोन्ही शेतकऱ्यांच्या बैलांचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाल्याने शेतकऱ्याने मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.