देवगड : दत्तक घेतलेले नऊ वर्षीय मुलीवरच बापाने अत्याचार केल्याची घटना देवगड तालुक्यात एका गावात उघडकीस आली. पोलिसांनी बापाला अटक केले आहे. या घटनेने मात्र गावात एकच उडाली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, मूल होत नसल्याने दत्तक घेतलेल्या मुलीवरच बापाने अत्याचार करण्यास सुरुवात केली. याबाबत पोलिस स्थानकात तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी बापाला तात्काळ अटक केली आहे. सध्या तो पोलिसांच्या कोठडीत आहे. मात्र या घटनेने देवगड तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.





