धक्कादायक बातमी .! सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या छपराचे काम सुरू असताना दोघे कामगार कोसळले जमिनीवर | एकाचा मृत्यू तर ; एक जखमी…!

123

सिंधुदुर्गनगरी : जिल्हा परिषदेच्या इमारतीवर लोखंडी पत्रे घालण्याचे काम सुरू असताना दोघे कामगार छपरावरून खाली कोसळले. या अपघातात एकाचा मृत्यू झाला आहे, तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. ही घटना आज सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास घडली. दरम्यान दोघांनाही जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

याबाबत अधिक माहिती अशी की, जिल्हा परिषदेच्या इमारतीवर लोखंडी पत्रे घालण्याचे काम गेले अनेक दिवस सुरू आहे. नेहमी प्रमाणे आज सकाळी हे काम सुरू असताना ९ वाजण्याच्या सुमारास जमशेद पाशा व नरेश सैनी हे दोन कामगार छपरावरून जमिनीवर कोसळले. या दोघांना तात्काळ जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

यातील जमशेद पाशा याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले. तर नरेश सैनी याला गंभीर दुखापत झाली / फ्रॅक्चर झाले आहे. याबाबत सिंधुदुर्गनगरी पोलिसांत खबर देण्यात आली आहे. अद्याप याबाबत गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.