पी.एम.किसान योजनेत ई केवायसी करून रु.12000/- वार्षिक पेन्शन मिळवा…!

231

देवगड : शेतकऱ्यांनो केंद्र शासनाच्या “पी.एम.किसान” योजनेचे वार्षिक रुपये 6000/- व राज्य शासनाच्या “नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे” वार्षिक रुपये 6000/- असे एकत्रित वार्षिक रुपये 12000/- पाहिजेत ना? मग पूर्ण करा इ केवायसी ची प्रक्रिया

(1) देवगड तालुक्यातील पी.एम. किसान योजनेच्या सर्व लाभार्थ्यांना आवाहन करण्यात येते की,e KYC करणे, बँक खात्याला आधार संलग्न करणे आणि Land Seeding केली असल्याची खात्री करून घ्यावी. (2) लाभार्थ्याला e KYC सोबतच बँक खात्याला आधार संलग्न करणे तसेच राज्याच्या भूमी अभिलेख नोंदीप्रमाणे अद्यावत करणे (Land Seeding) या तिन्ही बाबी करणे बंधनकारक करण्यात आलेले आहे.

अन्यथा केंद्र शासनाच्या “पीएम-किसान” तसेच राज्य शासनाच्या “नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना” या दोन्ही योजनेच्या एकत्रित वार्षिक रुपये 12000/- या लाभापासून वंचित राहू शकतात.
(3) e KYC पर्यायासमोर NO असल्यास लाभार्थ्यांना e KYC करण्यासाठी केंद्र शासनाच्या “PMKISAN GoI”App द्वारे “Face Authentication App” च्या माध्यमातून चेहऱ्याचा फोटो काढून ई – केवायसी करणे सुलभ झालेले आहे.

(4) Land Seeding पर्यायासमोर NO असल्यास, तलाठी किंवा तहसील कार्यालय यांच्याशी संपर्क साधून Land Seeding करून घ्यावी. (5) बँक खात्याला आधार संलग्न केलेले नसल्यास आपल्या बँकेत जाऊन बँक खात्याशी आधार संलग्न करून घ्यावे किंवा स्थानिक स्तरावर पोस्ट मास्तर यांच्यामार्फत इंडिया पोस्ट पेमेंट बँकेत (IPPB) खाते उघडणे.(6) इतर पर्याय म्हणून e- KYC करण्यासाठी सामाईक सुविधा केंद्र(CSC) तसेच ग्रामपंचायत मधील Biometrics केंद्रातून e KYC करावी.

(7) ज्या लाभार्थ्यांना वारंवार सांगूनही ई केवायसी करणार नाहीत असे लाभार्थी अपात्र घोषित करण्यात येतील याची सर्व लाभार्थ्यांनी नोंद घ्यावी.
(8) प्रलंबित लाभार्थ्यांचे इ केवायसी व बँक खाते आधार संलग्न करण्यासाठी दिनांक 20 जून व 21 जून रोजी गाव पातळीवर विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे.
यासाठी अधिक माहिती करिता आपले गावातील संबंधित कृषी सहाय्यक यांच्याशी संपर्क साधून e- KYC प्रलंबित असलेल्या लाभार्थ्यांनी 100% ई केवायसी करणे बाबत कैलास ढेपे, तालुका कृषी अधिकारी देवगड हे आवाहन करीत आहे.