कणकवलीतील एका बांधकाम व्यावसायिकाच्या घरात चोरी.!

69

कणकवली : तालुक्यातील उद्योजक सतीश नाईक यांच्या घरातील सोन्याचे दागिने आणि घर कामासाठी आणलेले प्लायवूड चोरीला गेले आहे. एकूण २ लाख ३८ हजार रूपयांचा मुद्देमाल चोरीस गेला आहे. सुतार कामासाठी आलेल्‍या कामगाराने ही चोरी केली असावी अशी फिर्याद नाईक यांनी पोलिसांत दिली आहे. त्‍याअनुषंगाने संशयितावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

श्री. नाईक यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, जानेवारी २०२२ पासून नव्याने बांधलेल्या घरातील फर्निचर कामाला व घराजवळील अन्य कामाकरिता संशयित आरोपी लीलाधर सुतार (मूळ राहणार राजस्थान) हा काम करत होता. मात्र तो २ जुन पासून आला नाही. यावेळी नाईक यांनी त्याला फोन केला असता त्याने मी कामावर येऊ नाही असे सांगितले. त्यावर त्यांना संशय आल्याने आपल्या घर, गोडाऊन पाहणी केली. यावेळी नवीन घराच्या कामासाठी आणलेले प्लायवूड २५५ पीस ठेवलेले होते. त्यातील १३५ पीस वापरले व ७२ हजार ५०० रुपये किंमतीचे २९ पीस कमी आढळले. तसेच घरातली १० ग्राम सोन्याची अंगठी व त्याला हिऱ्या चा खडा, १० ग्राम ची दुसरी अंगठी, १५ ग्राम बांगडी, ७.५०० ग्राम ३ कर्णफुले जोड, असे एकूण १ लाख ६६ हजाराची दागिने, व प्लायवूड मिळून एकूण २ लाख ३८ हजार ५०० रूपयांचा माल चोरीला गेल्याची फिर्याद सतीश विजय नाईक यांनी दिली आहे. यानुसार संशयित आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास कणकवली पोलीस स्टेशनचे पोलीस नाईक आबा पार्सेकर करत आहेत.