मोदी @ 9 अंतर्गत मोटारसायकल रॅली..!

136

सिंधुदुर्गनगरी : केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारला यशस्वीरीत्या ९ वर्ष पूर्ण झाल्याचे औचित्य साधून मोदी@9 या अभियानांतर्गत मुंबई गोवा महामार्गावर झाराप ते ओरोस अशी भव्य मोटरसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीचे नेतृत्व ‘विकास तीर्थ’ कार्यक्रमाचे लोकसभा संयोजक माजी खासदार निलेश राणे यांनी केले. या रॅलीत माजी आमदार प्रमोद जठार, जिल्हाध्यक्ष राजन तेली,विशाल परब,आनंद शिरवलकर यांच्यासह भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. केंद्र सरकारने गेल्या नऊ वर्षांत केलेली विकास कामे लोकांना समजावीत यासाठी या रॅलीचे आयोजन करण्यात आल्याचयावेळी निलेश राणे म्हणालेत.