सावंतवाडी : सावंतवाडी उप विभागीय अधिकारी प्रशांत पानवेकर यांनी विनापरवाना वाळू वाहतूक करणाऱ्या डंपरवर कारवाई केली.
सद्यस्थितीत मोठ्या प्रमाणात विना परवाना वाळू वाहतूक होत असून महसूल विभागही अँक्शन मोड वर असून अशा वाहतुकीवर महसूल विभागाकडून दंडात्मक कारवाई केली जात आहे.सावंतवाडी उपविभागीय अधिकारी प्रशांत पानवेकर यांनी पडवे माजगाव येथे विना परवाना वाळू वाहतूक करणाऱ्या डंपरवर कारवाई केली.कारवाई केलेला डंपर मंडळ अधिकारी आजगांव विनायक कोदे व तलाठी आजगाव नागराज.सी.यांनी जप्त करून तहसीलदार कार्यालय सावंतवाडी येथे जमा केला आहे.पुढील दंडात्मक कारवाई सुरू आहे.





