ठिय्या आंदोलनानंतर पोलिसांनी घेतली महिलेच्या विनयभंगाची तक्रार..!

130

कुडाळ : कुडाळ सरंबळ गावातील महिलेची विनयभंगाची तक्रार दाखल करून घ्यायला नकार देणाऱ्या कुडाळ पोलिसांविरोधात सरंबळ आणि कुडाळ मधल्या नागिरकांनी पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन केलं.
यावेळी कुडाळ येथील सर्व पक्षीय नेत्यांनी ठीय्या आंदोलनात सहभाग घेतला. अखेर पोलिसांनी त्या महिलेची विनयभंगाची तक्रार दाखल करून घेतली. या आंदोलनाला माजी खासदार निलेश राणे यांनी देखील भेट दिली. एखाद्या महिलेची तक्रार दाखल करून न घेणाऱ्या कुडाळ पोलिसांबाबत नागरिकांनी संताप व्यक्त केला. सरंबळ येथील पीडित महिला मंगळवारी रात्री सरंबळच्या तलाठ्यांविरोधात विनयभंगाची तक्रार देण्यासाठी कुडाळ पोलीस ठाण्यात आली होती. पण पोलिसांनी तिची तक्रार दाखल करून घेतली नाही.दरम्यान सरंबळ सरपंच सावजी कदम यांनी कुडाळ पोलिसांच्या या कारभाराविषयी नाराजी व्यक्त केली.