संजय पिळणकरांचा एलआयसीच्या एमडिंच्या हस्ते सन्मान…!

सावंतवाडी : आयुर्विमा क्षेत्रात अग्रेसर कामगिरी करणाऱ्या विमा प्रतिनिधी एलआयसी ऑफ इंडियाचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ शाखेचे प्रतिथयश आयुर्विमाप्रतिनिधी संजय पिळणकर यांचा २०२१-२२ च्या आर्थिक वर्षातील उल्लेखनीय कामगिरीची दखल घेऊन एलआयसी ऑफ इंडियाचे मॅनेजिंग डायरेक्टर सिद्धार्थ मोहंती यांच्या हस्ते ओरिसा-जगन्नाथ पुरी येथील हॉटेल सेव्हन हिल येथे शानदार सोहळ्यात सपत्नीक सन्मान करण्यात आला. यावेळी गुजरात, महाराष्ट्र व गोवा या झोनचे झेडएम विजय मिश्रा उपस्थित होते.

संजय पिळणकर हे गेली २१ वर्षे आयुर्विमा व्यवसायात काम करीत असून त्यांना आतापर्यंत आयुर्विमा क्षेत्रातील बिमारत्न,बिमाभूषण, एमडीआरटी आदी पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. संजय पिळणकर यांनी यापूर्वी सावंतवाडी तालुक्यातील सातार्डा, सातोसे व मडूरा गाव बिमाग्राम केले तर सावंतवाडी तालुक्यातील सातोसे व दोडामार्ग तालुक्यातील सोनावल जि.प.शाळेला बिमास्कुल करण्यात महत्वाची भूमिका बजावली. कुडाळ शाखेत पॉलिसि व प्रीमियमवर एका आर्थिक वर्षात नं १ चा व्यवसाय करणारे एकमेव विमाप्रतिनिधी ठरले.

एकाच दिवसात ११७ जीविते ग्रीनचॅनल खाली पूर्ण केल्या तर एकाच दिवशी १०१ युलीप पॉलिसि पूर्ण केल्या तसेच ७ महिन्यात ४२१ बिमागोल्ड पॉलिसिंची विक्रमी विक्री करून वेस्टन झोनमध्ये विक्रम केला. त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीचे कुडाळ शाखेचे शाखाधिकारी तुषार कर्णिकसर, सावंतवाडी एसओचे शाखाधिकारी लोभस गरुड, एबीएम विनायक पाटील, निवृत्त विकास अधिकारी डी जी सावंत व कुडाळ शाखेच्या वतीने विशेष अभिनंदन करण्यात आले आहे.