श्री देव कुणकेश्वर मंदिरात येथे ११ मे रोजी आंबा महोत्सवाचे आयोजन; मंदिर केली जाणार देवगड हापूसची आरास..!

343

देवगड : श्री क्षेत्र कुणकेश्वर येथे दिनांक 11 मे 2023 रोजी हापूस आंबा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून कुणकेश्वर मंदिरात तसेच श्रींच्या पिंडीभोवती आकर्षक अशी हापूस आंब्याची आरास करण्यात येणार आहे. हापूस आंब्याच्या आराशीमध्ये सजलेल्या श्री देव कुणकेश्वराचे दर्शन भाविकांना घेता येणार आहे. भाविकांनी याचा अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन श्री देव कुणकेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्ट कुणकेश्वर तसेच ग्रामस्थ कुणकेश्वर यांच्या वतीने करण्यात येत आहे