देवगड : बारसु रिफायनरी समर्थनार्थ केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी जाहीर केल्याप्रमाणे शनिवार ६ मे २०२३ रोजी देवगड तालुक्यातील हजारो संख्येने कार्यकर्ते आणि नागरिक बारसु रिफायनरी समर्थक रॅलीमध्ये सहभागी होणार आहेत. या संदर्भात नियोजनाची बैठक शुक्रवार ५ एप्रिल रोजी देवगड येथील आमदार संपर्क कार्यालयामध्ये झाली.
या बारसु मध्ये होणाऱ्या रिफायनरी समर्थनार्थ रॅलीमध्ये देवगड तालुक्यातील भाजप कार्यकर्ते , शेतकरी व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन भाजपा जिल्हा उपाध्यक्ष बाळा खडपे, जिल्हा कार्यकारणी सदस्य संदीप साटम यांनी केले आहे. यावेळी भाजपा देवगड तालुका पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.





