पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांची कणकवली उपजिल्हा रुग्णालयाला भेट.!

64

कणकवली : तालुक्यातील मुंबई – गोवा महामार्गावर वागदे येथे कुडाळहून – देवगड पाटगाव येथे लग्नाचे वऱ्हाड घेऊन जाणारा टेम्पो पलटी होऊन अपघात झाला होता. त्यामुळे त्या टेम्पोतून प्रवास करणाऱ्या लोकांना गंभीर दुखापत झाली होती.

पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी गुरुवारी कणकवली उपजिल्हा रुग्णालयात भेट दिली व अपघातग्रस्त जखमींवर कशा पद्धतीने उपचार सुरू आहेत याचा आढावा घेतला. तसेच आरोग्य अधिकाऱ्यांना योग्य त्या उपाययोजना आणि योग्य औषधोपचार करण्याच्या दिल्या सूचना.

यावेळी आ. नितेश राणे, नगराध्यक्ष समीर नलावडे, उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश सावंत, शहराध्यक्ष अण्णा कोदे, संदीप मेस्त्री, तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, विराज भोसले, यांच्यासह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.