देवगड : देवगड तालुक्यातील १७ ग्रामपंचायतच्या २१ जागांसाठी पोटनिवडणुका १७ मे रोजी होत असून यासाठी शुक्रवारी २ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. देवगड तालुक्यातील १७ ग्रामपंचायतच्या पोटनिवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली असून गुरुवारपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. या ग्रामपंचायतीच्या निवडणुका १८ मे रोजी होणार असून मतमोजणी १९ मे रोजी होणार आहे. यामध्ये कोळोशी, हडपिड मनचे, पडेल, आरे ,ठाकूरवाडी (प्रभाग ३) व सरपंच पदासाठी निवडणूक गवाणे, गोवळ, कोटकामते, मुटाट, कातवन, सांडवे, कुणकवन, ओंबळ, पेंढरी, मळेगाव व विजयदुर्ग सरपंचापदासाठी निवडणूक होत आहे.
तालुक्यातील १७ ग्रामपंचायतच्या एकूण २१ जागांसाठी पोटनिवडणूक होत असून यामध्ये विजयदुर्ग व ठाकूरवाडी या दोन्ही ग्रामपंचायतीचे सरपंचपद अनुसूचित जमाती महिला प्रवर्गासाठी आरक्षित असल्याने हे पद आरक्षित प्रवर्गाच्या उमेदवार नसलेले रिक्त राहिले आहे. त्यामुळे या दोन्ही ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी निवडणूक होत आहे. गुरुवारपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. मात्र शुक्रवारी कोटकामते एक मुटाट एक असे दोन उमेदवारी अर्ज दाखल झाले आहे.




