विकास कामे करण्यासाठी ग्रामपंचायत आणि सरपंच सक्षम : मनाली गुरव

कणकवली : विकास कामे करण्यासाठी ग्रामपंचायत आणि सरपंच सक्षम आहेत. तसेच ग्रामपंचायत कारभार बेजबाबदारपणे करत नसून मुळात खरी वस्तुस्थिती काय आहे हे आरोप करणाऱ्या बावशी तेलीवाडी येथील ग्रामस्थांनी पहावे, असे प्रस्तुतर तोंडवली बावशीच्या सरपंच मनाली गुरव यांनी दिले आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, तोंडवली बावशी तेलीवाडी मुख्य रस्ता व तेथील रहिवासी संतोष तेली यांचे लगतच्या जमीनदार यांच्यासमवेत वाद सुरू आहेत. तर काही झालेले वाद हे न्यायप्रविष्ठ आहेत, असे असताना वैयक्तिक वादात हस्तक्षेप करणे ग्रामपंचायत किंवा सरपंचांना अधिकार नाही. तरीही बरेच वेळा दोन्ही जमीन मालकांना समोरासमोर बसून समंज्यसपणे मार्ग काढण्याचा प्रयत्न करण्यात आला. पुढे काम सुरू करण्याचे ठरले होते. मात्र दोन्ही जमीन मालकांचे अंतर्गत वादामुळे सुरू असलेले वाद मिटत नसल्याने दोन्ही मालकांच्या समस्या ह्या न्यायप्रविष्ठ आहेत. त्यामुळे ग्रामपंचायतला त्यात कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप करता येत नसल्याचे तोंडवली बावशी ग्रामपंचायत सरपंच मनाली गुरव यांनी सांगितले.

तसेच सरपंच गुरव पुढे म्हणाल्या की, तेलीवाडी ते बावशी मुख्य रस्ता पंधरा वित्त आयोग मधून मंजूर झालेला आहे. तसेच ग्रामपंचायत प्रशासनाचे काम पूर्ण करण्यास कोणत्याही प्रकारचा अडथळा नसून तेथील काम करण्यास तेथील ग्रामस्थांच्या अंतर्गत वादामुळे काम सुरू करण्यास विलंब होत आहे. आम्हाला गावचा विकास करायचा आहे. मात्र ग्रामस्थांच्या काही वैयक्तिक अंतर्गत वादांमुळे काम सुरू करणे शक्य होत नाही आणि शेवटी ती कामे रखडून राहतात. तसेच ठरल्याप्रमाणे मंजूर झालेली कामे ही आम्हाला पूर्ण करायची आहेतच. परंतु अंतर्गत वादांमुळे कामे रखडून राहतात. त्यात ग्रामपंचायत बेजबाबदारपणे वागत आहे असे म्हणता येत नसल्याचे ठणकावत संतोष तेली व श्रीधर तेली यांनी केलेले आरोप हे बिनबुडाचे आहेत. त्यांनी लगतदारांबरोबर असलेले वाद मिटवावे, त्यानंतर ग्रामपंचायतवर आरोप करावेत. वस्तुस्थितीची माहिती न घेता ग्रामपंचायतवर केलेले बिनबुडाचे आरोप हे खपवून घेतले जाणार नसल्याचे देखील सरपंच मनाली गुरव यांनी सांगितले.

तेलींना सरपंचांचा सल्ला.!

तेली यांनी रस्त्याचे काम सुरू करण्यासाठी पर्यायी मार्गाची व्यवस्था करून द्यावी. तात्काळ रस्त्याचे काम सुरू करून पूर्ण करून देण्याची जबाबदारी ग्रामपंचायतची राहील. परंतु विनाकारण जर ग्रामपंचायतवर असे खोटे आरोप केले तर आम्ही ते आरोप खपवून घेणार नसल्याचा इशाराही सरपंच गुरव यांनी दिला

वैयक्तिक वाद ; सरपंचांसोबत हमरातुमरी

पुढे सरपंच गुरव म्हणाल्या की, २६ एप्रिल रोजी बावशी येथे सुरू असलेल्या जलजीवन मिशनच्या कामाची व काही घरांना भविष्यात उद्भवणाऱ्या पाण्याच्या समस्येवर त्या पाहणी करत असताना तिथे अंतर्गत वादाच्या रागाने संतोष तेली, वासुदेव तेली हे अन्य दोघे जणांसमवेत टाकीजवळ आले व हमरातुमरी करत अंगावर धावून येत तू इथे पाईप लाईन का टाकली..? जीवन मिशनचे काम करायला तुला कोणी सांगितले..? तसे तू केलेली पाईपलाईन काढून टाक व तू उद्या येच पंचायतीत तुला मी बघून घेतो असे बोलून अंगावर धावून आल्याचे देखील सरपंच गुरव यांनी सांगितले. त्यामुळे तेली यांनी एका स्त्री सरपंचाबरोबर केलेली हमरा – तुमरी ही योग्य आहे का ? याचे आत्मपरीक्षण करावे असा सल्लाही सरपंचांनी तेली यांना दिला आहे. तसेच शासकीय काम सुरू आहे ते सुरूच राहणार असून कोणत्याही कारणासाठी थांबणार नसल्याचेही त्यांनी आरोपकर्ते तेली यांना सुनावले आहे.

सरपंच गुरव यांनी पोलिसात केली तक्रार

जल जीवन मिशनच्या कामाबाबत पाहणी करण्यासाठी गेल्यावर अरे रवी गरज अंगावर धावून आलेल्या संतोष तेलीवर वासुदेव केली यांच्याविरुद्ध कणकवली पोलीस ठाण्यात तक्रार केली असल्याची माहिती सरपंच गुरव यांनी दिली आहे.