मुख्याध्यापक मारहाण प्रकरण | सात जणांना जामिन | अँड. अनिल निरवडेकर यांचा युक्तिवाद

सावंतवाडी : कलंबिस्त हायस्कूलचे मुख्याध्यापक अभिजीत जाधव यांना शाळेत घुसून जातिवाचक शिवीगाळ, मारहाण केल्याप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या सात जणांची ओरोस येथील विशेष न्यायालयाने प्रत्येकी २५ हजाराच्या जामिनावर आज मुक्तता केली. या कामी अँड. अनिल निरवडेकर यांनी काम पाहिले.

रश्मी राजेश पाटकर, वैष्णवी विजय पाटकर, संजीव शंकर मोहिते, प्रतिक मोहिते, विजय पाटकर, शैला संजू मोहिते, प्रियांका मोहिते अशी त्यांची नावे आहेत.

हा प्रकार कलंबिस्त येथे घडला होता. राजेश पाटकर नामक शिक्षकाला अतिरिक्त ठरवण्याच्या रागातून मुख्याध्यापकांनी बोलावलेल्या सभेत या आठही जणांनी शिवीगाळ करत मारहाण केल्याची तक्रार जाधव यांनी केली होती. त्यानुसार संबंधितावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर सात जणांना अटक करण्यात आली होती. तर एक जण अद्यापही फरार आहे ते सद्यस्थितीत न्यायालयीन कोठडीत होते.