केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटचा उद्या लोकार्पण सोहळा…

70

नागपूर : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे आज 26 एप्रिल रोजी रात्री नागपूर येथे आगमन होणार आहे. 27 एप्रिल रोजी नागपूर जिल्ह्यातील जामठा येथील नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटच्या कार्यक्रमाला ते उपस्थित राहणार आहेत. यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील उपस्थित राहणार आहेत.

जामठा येथील नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट नागपूरचा लोकार्पण सोहळा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. आज नागपूरचे पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी स्वतः येऊन कार्यक्रम स्थळी जागेची पाहणी करीत आढावा घेतला. कार्यक्रमाची तयारी अंतिम टप्प्यात असून मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे 26 एप्रिल रोजी रात्री दहा वाजता आगमन होणार आहे. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सायंकाळी 7.15 वाजता आगमन होईल. आज रात्री ते नागपूर येथे मुक्कामी असून 27 एप्रिलला सकाळी 10.30 वाजता जामठा येथील नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट येथे उद्घाटन सोहळयास उपस्थित राहतील.