पनवेल नजीक प्लायवूड गोदामाला आग | जीवितहानी नाही

पनवेल : पनवेल नजिक इंडियाबुल्स जवळ कोन गावातील प्लायवूडच्या गोदामाला लागली अचानक आग लागली. या
आगीत संपूर्ण गोदाम जळून खाक झाले. मात्र, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती मिळत आहे.

आगीचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. पनवेल अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमक दलाचे प्रयत्न सुरू आहेत.