मळेवाड हेदुलवाडीतील मोहन राऊत यांचं निधन…!

सावंतवाडी : मळेवाड हेदुलवाडी येथील मात्र सद्यस्थितीत मुंबई येथे वास्तव्यात असणारे श्री मुसळेश्वर कला क्रीडा मंडळ, मंडळाचे माजी अध्यक्ष आणि कुठल्याही कार्यक्रमात हिरहिरीने सहभागी होणारे मोहन (दाजी) सावळाराम राऊत (वय 76) यांचे वृद्धापकाळाने आज सकाळी निधन झाले. राऊत यांच्या जाण्याने गावातून व मुंबईतील मित्र परिवारातून शोक व्यक्त केला जात आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, सून, नातवंडे असा परिवार आहे.