एमआयडीसी मधील कारखान्याला आग | 3 कामगारांचा होरपळून मृत्यू

नागपूर : नागपूर जिल्ह्यातील हिंगणा एमआयडीसीतील सोनेगाव निपाणी येथे कटारिया ॲग्रो इंडस्ट्रीजला आज भीषण आग लागली. या दुर्घटनेत 3 कामगारांचा मृत्यू झाल्याची माहिती असून काही कामगार आतमध्ये अडकले असण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

अग्निशमन विभागाचे 10 बंब घटनास्थळी दाखल झाले असून, कामगारांना बाहेर काढण्यासाठी तसेच घुमसणारी आग नियंत्रणात आणण्यासाठी जवान प्रयत्नांची शर्थ करीत आहेत. सकाळच्या सुमारास ही घटना घडली. संबंधित कंपनीत सेमीकंडक्टर बनविण्यात येतात. तेथे सकाळी आग लागली, त्यावेळी कामगार काम करत होते. आगीमुळे काही जण आतच अडकले.

त्यात तिघांचा मृत्यू झाला असून 3 कामगार जखमी झालेले झाले असून त्यांना रुगणालायत दाखल करण्यात आलेले आहे. अग्निशमन दलाच्या सुमारे 10 गाड्या घटनास्थळी पोहोचल्या असून बचावकार्य सुरू आहे. आग नियंत्रणात आली आहे.
या कंपनीत आग लागल्याने 3 कामगारांचा मृत्यू झाल्याचा घटनेबद्दल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे.