सिंधुदुर्गात येणार १९६ इलेक्ट्रिक बसेस | अभिजीत पाटील यांची माहिती ; चार्जिंग स्टेशन उभारणार

238

कणकवली : पर्यावरण पूरक अशा १९६ इलेक्ट्रिक बसेस सिंधुदुर्गात लवकरच धावणार आहेत. राज्यात सुमारे ५००० इलेक्ट्रिक बसेस येणार आहेत. यातील सिंधुदुर्ग विभागात १९६ बसेस असणार आहेत. सिंधुदुर्ग हा पर्यटन जिल्हा आहे. तसेच पर्यावरण पुरोहित जिल्हा असल्याने सिंधुदुर्गला सर्वाधिक इलेक्ट्रिक बसेस मंजूर झाल्याची माहिती सिंधुदुर्ग एसटी विभागाचे विभाग नियंत्रक अभिजीत पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.

एसटी महामंडळाच्या ताफ्यातील इलेक्ट्रिक बसेस शिवाई या नावाने धावणार आहेत. या बसेस चार्जिंग करण्यासाठी कणकवली, सावंतवाडी, कुडाळ, वेंगुर्ली आणि देवगड या आगारांमध्ये चार्जिंग स्टेशनही उभारली जाणार आहेत.

एकदा चार्जिंग केल्यानंतर हे बस ३६० किलोमीटर पर्यंत धावणार आहे. दरम्यान सिंधुदुर्ग एसटी विभागात नव्या ९० बसेस दाखल होत असल्याची माहिती श्री. पाटील यांनी दिली आहे.