आ. नितेश राणे यांच्या माध्यमातून रस्ता नूतनीकरणासाठी आठ लाख रुपयांचा निधी..!

91

देवगड : कणकवली देवगड वैभववाडी विधानसभा मतदारसंघाचे आ. नितेश राणे यांनी देऊळवाडी मुख्य रस्ता ते पावणाई मंदिर ओंबळ हा रस्ता नूतनीकरणासाठी आठ लक्ष रुपयांचा निधी मंजूर केला होता त्याचे भूमिपूजन भाजप जिल्हा सदस्य संदीप साटम यांच्या हस्ते नुकतेच पार पडले, यावेळी बंड्या नारकर ओंबळ सरपंच अरुण पवार ,उपसरपंच प्रवीण पवार ,ग्रा.सदस्य सौ.संचित पवार,संजय पवार,अजित पवार ,अनिल नवले ,प्रकाश जाधव,अंकिता पवार ,भालचंद्र पवार ,चंद्रकांत पवार ,प्रकाश पवार ,शरद पवार ,महेश पवार ,प्रशांत पवार ,सुरेंद्र पवार ,अशोक पवार ,प्रेमा पवार ,तुकाराम परब ,सुरेश पवार ,सागर पवार आदी ग्रामस्थ उपस्थित होते.रस्त्याच्या कामाला सुरुवात झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले