देवगड: देवगड पवनचक्की येथील सुमित गणपत जुवाटकर , राहणार देवगड पवनचक्की यांची अज्ञात इसमाने ऑनलाइन स्कुटी विक्री करण्याच्या बहाना करून १ लाख २० हजार ४० रुपये एवढे रकमेची मोबाईल मधील गुगल पे व फोन पे पाठविण्यास सांगून फसवणूक केली या प्रकरणी देवगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार देवगड पवनचक्की येथील सुमित गणपत जुवाटकर वय ३३ यांची १० फेब्रुवारी २०२३ रोजी रात्री १० ते ११ फेब्रुवारी २०२३ रोजी दुपारी २:३० च्या दरम्याने स्कुटी विक्री करण्याच्या बहानाने १ लाख २० हजार ४० रुपये एवढी रक्कम गुगल पे व फोन पे ॲप द्वारे पाठविण्यास सांगून ऑनलाइन फसवणूक केली.म्हणून याबाबतची तक्रार सुमित जुवाटकर यांनी १९ एप्रिल रोजी देवगड पोलीस ठाण्यात यांनी दिली आहे त्यानुसार देवगड पोलिसांनी भादवि कलम ४१९,४२० माहिती तंत्रज्ञान सुधारणा अधिनियम २००८ चे कलम ६६(c),६६(d) अन्वये गुन्हा दाखल केला आहे याबाबतच्या अधिक तपास देवगड पोलीस करत आहेत.





